पुणे : येरवड्यात भरदिवसा वार करुन लुटणाऱ्या 5 चोरट्यांना अटक

3arrested_54.jpg
3arrested_54.jpg

पुणे : भरदिवसा एका नागरिकांवर वार करुन तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लूटणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ ही घटना घडली होती. 

आकाश संजय सकपाळ(वय 20,रा.येरवडा), ओमकार युवराज सोनवणे (वय 20,रा.येरवडा), कुणाल किसन जाधव(वय 19,रा.खराडी), प्रज्वल बापु कदम (वय 19) व अर्जुन दशरथ म्हस्के अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुधाकर क्षिरसागर (37,रा.आळंदी रस्ता) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

फिर्यादी हे शनिवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरुन मालकाने सांगितल्याप्रमाणे, विश्रांतवाडी, शांतीनगर, प्रतिकनगर, नागपुर चाळ, बिडीकामगार चाळ, राज चौक, गोल्फ क्‍लब आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून रोख रक्‍कम घेऊन निघाले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्याच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवली होती. ते तेथून कोरेगाव पार्कच्या दिशेने जात असताना त्यांना येरवडा क्षेत्रीय कार्यालयासमोर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवून माझ्या अंगावर गाडी का घातली असे म्हणत भांडणे सुरु केली. त्याच दरम्यान त्याचे तीन साथीदार पाठीमागून आले. त्यातील दोघेजण फिर्यादीकडील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने झटापट करत बॅग हिसकावून दिली नाही. यामुळे एकाने फिर्यादीच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील बॅग, दोन मोबाईल असा 3 लाख 17 हजार 800 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता.

दरम्यान, संबधित गुन्हा हा सराईत गुन्हेगार विशाल बाणेकर व आकाश कांचीले यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये उघड झाले. दरम्यान, सर्व आरोपी लक्ष्मीनगर येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये झोपले असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील 1 लाख 8 हजाराची रक्कम व रिक्षा असा 2 लाख 8 हजाराचा ऐवज हस्तगत केला.

ही कारवाई  सहायक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बहिरट, पोलीस कर्मचारी संदीप मांजुळकर, हणमंत जाधव, प्रशांत पवार यांच्या पथकाने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com