बिटकॉइन फसवणुकीबाबत 50 जणांच्या तक्रारी दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - बिटकॉइन फसवणूक प्रकरणामध्ये आत्तापर्यंत शहरातील ५० जणांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. ही फसवणूक पाच कोटी रुपयांहून अधिक असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीद्वारे भरमसाट परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना तत्काळ अटक केली, तर बिटकॉइनचा प्रमुख सूत्रधार अमित भारद्वाज याच्यासह त्याचा भाऊ विवेक भारद्वाज यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मागील आठवड्यात दिल्ली विमानतळावरून अटक केली.

पुणे - बिटकॉइन फसवणूक प्रकरणामध्ये आत्तापर्यंत शहरातील ५० जणांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. ही फसवणूक पाच कोटी रुपयांहून अधिक असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीद्वारे भरमसाट परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना तत्काळ अटक केली, तर बिटकॉइनचा प्रमुख सूत्रधार अमित भारद्वाज याच्यासह त्याचा भाऊ विवेक भारद्वाज यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मागील आठवड्यात दिल्ली विमानतळावरून अटक केली. भारद्वाज बंधूंना अटक केल्यानंतर या प्रकरणात आर्थिक फसवणूक झालेल्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदविण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानुसार ५० जणांनी पुढे येऊन तक्रार नोंदविली आहे. पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राधिका फडके, पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तपास पथकात समावेश आहे.

Web Title: 50 complaints were filed against Bitcoin fraud