पुण्यातून देशात पाठविले ५० लाख डोस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने मंगळवारी भल्या पहाटे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (एसआयआय) ‘कोव्हिशिल्ड’ लशीचे वितरण सुरू झाले. सीरममधून लस घेऊन पहिले रेफ्रिजरेटर व्हेईकल पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. तो लोहगाव विमानतळाच्या दिशेने निघाले.

‘सीरम’मधून पहिले रेफ्रिजरेटर व्हेईकल बाहेर; विमानामध्ये लशीचे ३४ बॉक्स
पुणे - देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने मंगळवारी भल्या पहाटे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (एसआयआय) ‘कोव्हिशिल्ड’ लशीचे वितरण सुरू झाले. सीरममधून लस घेऊन पहिले रेफ्रिजरेटर व्हेईकल पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. तो लोहगाव विमानतळाच्या दिशेने निघाले. पोलिस बंदोबस्तात ही लस विमानतळावर उतरविण्यात आली. तेथून चेन्नई, दिल्ली अशा देशातील वेगवेगळ्या १३ ठिकाणी ५० लाख लशीचे डोस पाठविण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात गेल्या वर्षी जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर मार्चपासून रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. कोरोनाच्या या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी पुण्यातील ‘एसआयआय’ने कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस उत्पादित केली. ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्टा झेनिका यांनीही ही लस विकसित केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपत्कालीन वापराला हिरवा कंदील दाखवला होता.

सात ते आठ कोटी डोसची दरमहा निर्मिती - आदर पूनावाला

त्यानंतर केंद्रीय आरोग्य खात्याच्या ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (डीसीजीआय) व्ही. जी. सोमाणी यांनीही याच्या वापरला मान्यता दिली. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी लशीचे वितरण सुरू झाले आहे. ‘एसआयआय’कडून केंद्र सरकारने सोमवारी एक कोटी १० लाख डोस लशीची खरेदी नोंदविली.

राज्याच्या वेगवेगळ्या भागात लशीसाठी शीतगृहे सज्ज

‘एसआयआय’चे मुख्यालय पुण्यात असल्याने पुण्यातून देशाच्या वेगवेगळ्या भागात लस वितरित होणार, हे स्पष्ट झाले होत. त्यानुसार मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ‘सीरम’मधून फुलांनी सजवलेले पहिला रेफ्रिजरेटर व्हेईकल बाहेर पडले. लोहगाव विमानतळावर लशीची वाहतूक करण्यासाठी विमाने सज्ज ठेवली होती. पोलिस बंदोबस्तात ही वाहने विमानतळावर पोचली.

पुणे जिल्ह्यातील यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज

त्यातून लस उतरवून त्या विमानात ठेवण्यात आल्या. त्यानंतर लस घेऊन जाणाऱ्या पहिल्या विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले. त्यात लशीने भरलेली ३४ बॉक्‍स होते. त्याचे वजन सुमारे ११०० किलो होते. त्या पाठोपाठ गुजरात, लखनौ, तमिळनाडू अशा वेगवेगळ्या १३ ठिकाणी लस पाठविण्यात आली. त्यात काही लशींची वाहतूक रेफ्रिजरेटर व्हेईकलमधूनही करण्यात येत असल्याची माहिती सीरमच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 lakh doses sent to the country from Pune