मोसे, मुठा खोऱ्यांमध्ये ५० टक्के भातलावणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पिरंगुट - मुळशी तालुक्‍यात पावसाने दमदार व समाधानकारक हजेरी लावल्याने मुठा खोरे, तसेच लवासा परिसरातील भातखाचरांत पाणी साचले आहे. बहुतांशी ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरवात केली आहे. मोसे आणि मुठा खोऱ्यांत पन्नास टक्के भातलावणी झाली आहे. पावसाने साथ दिल्याने भातरोपांचेही मोठे नुकसान झाले नाही.

मुठा खोरे, टेमघर धरणांचे पाणलोट क्षेत्र तसेच लवासा भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. पश्‍चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने लवासा रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. 

मुठा खिंड, कोळावडे, आंदगाव आदी ठिकाणच्या रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने, तसेच काही ठिकाणी पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. सुटीचा दिवस असल्याने मुठा खिंड, टेमघर धरण तसेच लवासा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेत होते. सर्वत्र धुक्‍यांचे लोळ, पर्जन्य धारा, धबधब्यांच्या पाण्याच्या आवाज, थंडगार वारा आणि हिरवाईची रेलचेल पाहायला मिळते. त्यामुळे पर्यटकांचा ओढाही लवासा परिसराकडे वाढला आहे. लवासाच्या प्रवेशद्वाराबाहेर आज सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पिरंगुट रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते. 

Web Title: 50 percent Rice-planting in Mutha valley

टॅग्स