रमजाननिमित्त विविध देशातून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजारात

प्रवीण डोके
शुक्रवार, 10 मे 2019

मार्केट यार्ड (पुणे) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात इराण, इराक, सौदी, ओमन येथून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजार उपलब्ध झाले आहेत. बाजारामध्ये १०० टनापेक्षा जास्त खजुराची अवाक झाली आहे. यामध्ये ६० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत प्रतिकीलो किमतीचे खजूर बाजारात मिळत आहेत.

रमजान महिन्यात खजुराची मागणी लक्षात घेता, व्यापाऱ्यांनी ओमन, मस्कत, इराण, इराक, सौदी या आखाती देशातून खजूर आयात केले आहे. त्यामध्ये लाल खजूर आणि काळी खजूर अशा दोन प्रकारच्या खजूर उपलब्ध असून लाल खजूर साधारणतः ६० रुपये ते १०० रुपये प्रति किलो, तर काळी खजूर १०० रुपये ते २००० रुपये प्रती किलो बाजारात उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल खजुरीचे भाव स्थिर असून काळी खजूर मात्र या वर्षी ४० ते ५० रुपये प्रति किलो महागली आहे. 

बाजारात सध्या अजवा, मगजोल, बुमेन, फर्द, किमिया, फरत, सुलतान, रुक्सार, बुरारी, किंग यासह ५० पेक्षा जास्त खजुरचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये आर्थिक दृष्ट्या खजूर न परवडणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी ६० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत खजूर उपलब्ध आहे. तर उच्च प्रतीची सुकरी, अजवा, मगजोल या १२०० ते २००० रुपये प्रति किलो पर्यंत उपलब्ध आहे. 

अजवा जातीच्या खजुराचे झाड मोहम्मद पैगंबर यांनी लावल्याची आख्यायिका आहे, त्यामुळे या खजुरीला बाजारात मुस्लिम बांधवांकडून अधिक मागणी आहे. अजवा, मगजोल आणि बूमेन हे खजूर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आणि चवीलाही उत्कृष्ट असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

"काळया खजुरामध्ये विविध प्रकारच्या पॅकिंगला सर्वाधिक मागणी आहे. काळी खजूर ही आखाती देशांतून आयात केली जाते. बाजारामध्ये आतापर्यंत शंभर टनापेक्षा जास्त खजुराची आवक झाली आहे."
- दिनेश सेठ ( व्यापारी, मार्केटयार्ड)

"बाजारात ५० पेक्षा जास्त प्रकारच्या खजूर उपलब्ध आहे. यावर्षी इराक मध्ये लाल खजुराचे उत्पादन जास्त झाल्याने यंदा बाजारात त्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे लाल खजुराचे भाग स्थिर आहेत."
- नरेंद्र जैन ओसवाल ( व्यापारी, मार्केटयार्ड)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 types of date palm in market on the occasion of Ramjan