महापालिकेचे ५०० कोटी सरकारकडे पडून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - महापालिकेने राज्य सरकारकडे भूसंपादनासाठी जमा केलेले सुमारे ५०० कोटी रुपये पडून असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही रक्कम ठेव स्वरूपात ठेवली असती तर व्याजाच्या रूपाने उत्पन्न मिळाले असते, असा दावा माजी उपमहापौर आबा बागूल यांनी केला आहे. 

महापालिकेने विविध विकासकामे आणि प्रकल्पांसाठी विकास आराखड्यात आरक्षणे टाकली आहे. या जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला जागेच्या मोबदल्यापैकी निम्मी रक्कम शासकीय कोशागारात जमा करावी लागत होती. गेल्या काही वर्षांत राज्य सरकारच्या कोशागारात महापालिकेचे सुमारे ५०० कोटी रुपये पडून आहेत. यापैकी किती जागा ताब्यात घेतल्या, असा प्रश्‍न बागूल यांनी उपस्थित केला आहे. आरक्षण टाकलेल्या जागेवर किती ठिकाणी झोपड्या उभ्या राहिल्या याचीही माहिती प्रशासनाने जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

भूसंपादन कायद्यात २०१३ मध्ये झालेल्या बदलानुसार मूळ मालकाला दुप्पट मोबदला द्यावा लागणार आहे. आता नवीन बदलानुसार दुप्पट मोबदला देण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. नवीन विकास आराखडा मान्य केला असून, अकरा समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी किती पैसा लागेल, याचा विचार करून त्या दृष्टीने तरतूद करायला हवी, असेही बागूल यांनी म्हटले आहे.    

Web Title: 500 crore of municipal corporation fall to the government