पाचशे विद्यार्थी अवैध

Savitribai-Phule-University
Savitribai-Phule-University

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये अवैधरीत्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर (पॅरासाइट) कारवाई करूनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप वसतिगृह सोडलेले नाही. यामुळे बाहेरगावाहून विद्यापीठात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित आहेत. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडल्याने रिक्त जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना उद्या देण्यात येणार आहेत.

विद्यापीठातील वसतिगृहात पाचशेहून अधिक विद्यार्थी अवैधरीत्या राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विद्यापीठात कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश नसतानाही हे विद्यार्थी तेथे राहत आहेत. यातील काही जण खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करीत आहेत. त्यांना वसतिगृह सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, प्रशासनाला न जुमानता त्यांनी वास्तव्य कायम ठेवले. त्यामुळे विद्यापीठाने गेल्या आठवड्यात पाच क्रमांकाच्या वसतिगृहात कारवाई करीत तेथील ६८ खोल्यांना कुलूप लावले होते.

विद्यापीठाने अचानक कारवाई केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला होता. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर विद्यापीठात अवैधरीत्या राहत असल्याचे कबूल करून माफीनाफा दिला होता. तसेच वसतिगृह सोडण्यासाठी पाच दिवसांची मुदतही मागितली होती.

विद्यापीठाने ती मान्य केली. यादरम्यान काही विद्यार्थ्यांनी खोल्या सोडल्या. मात्र, पाच दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही काही जण अजूनही वसतिगृहात राहत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात खोली देणे कठीण होत असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

विद्यापीठातील वसतिगृहाची एकूण प्रवेशक्षमता तीन हजार आहे. त्यातील दीड हजार प्रवेश प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. यात सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी कायम आहे. अवैध विद्यार्थ्यांनी खोल्या बळकावल्याने गरजू विद्यार्थ्यांना खोल्या मिळत नाहीत.

२७२ अवैधरीत्या राहणाऱ्यांवर कारवाई
२५० अवैधरीत्या राहणारे विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com