पाचशे विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकरी

पुणे - कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरीची संधी मिळालेले जेएसपीएम व टीएसएसएम ग्रुपच्या आभियांत्रिकीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.
पुणे - कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरीची संधी मिळालेले जेएसपीएम व टीएसएसएम ग्रुपच्या आभियांत्रिकीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

पुणे - जेएसपीएम व टीएसएसएम ग्रुपच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमधून या वर्षी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना नामवंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली.

मंदी असतानाही विद्यार्थ्यांची झालेली ही निवड महत्त्वाची असल्याची माहिती ‘जेएसपीएम’चे विश्वस्त ऋषिराज सावंत आणि मुख्य टीपीओ प्रा. संतोश बोरडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, महाविद्यालयांतील उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम, महाविद्यालयांना मिळालेली नॅकची ‘अ’ श्रेणी आदी बाबी विचारात घेऊन नामवंत कंपन्यांनी अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मुलाखती घेऊन त्यांची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ लाख ते १८ लाख रुपयांचे पॅकेज कंपन्यांमार्फत मिळाले आहे.

टीसीएस, कॅपजेमिनी, झेन्सार टेक्‍नॉलॉजी, फायजर्व, सिक्‍लोर टेक्‍नॉलॉजी अशा विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला क्वालिटी ॲश्‍युरन्स विभाग, आठ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी, सर्व शिक्षक आदींच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली असल्यचेही सावंत आणि बोरडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com