#shivrajyabhishek शिवराज्याभिषेक दिनी उभारली ५१ फुटी स्वराज्यगुढी

pune.jpg
pune.jpg

पुणे : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष, पारंपरिक वेशात सुवासिनींनी केलेले औक्षण, मराठमोळया पुणेकरांचा जल्लोष आणि स्वराज्यगुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती,  अशा शिवमय झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ५१ फूट स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन एसएसपीएमएसच्या ऐतिहासिक प्रांगणात मोठया उत्साहात साजरा झाला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. यावेळी समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष व स्वराज्यगुढीचे संकल्पक अमित गायकवाड, राजाभाऊ ढमढेरे तसेच स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यासह असंख्य पुणेकर उपस्थित होते. शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यातील सर्व स्वराज्य घराणी यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभारण्यात आली. 

अमित गायकवाड म्हणाले, श्री शिवछत्रपतींनी ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्य स्थापन करुन भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण केले होते. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाचे अनन्य साधारण महत्व देशवासियांना समजावे, याकरीता ६ जून हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वराज्यदिन म्हणून जाहीर करावा. शिवराज्याभिषेक मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात ही संकल्पना समितीतर्फे आम्ही राबविण्याचे आवाहन केले होते. याला पुणेकरांनी मोठया प्रतिसाद देत घराघरात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला.  

सोहळ्याचे यंदा ७ वे वर्ष असून, अमित गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची आरती उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते झाली. समितीचे समन्वयक अनिल पवार, शांताराम इंगवले यांच्या पुढाकारने पुणे जिल्हा परिषदेने मुख्य सदनासोबतच १३ पंचायत समिती कार्यालये, १७०० ग्रामपंचायतींमध्ये स्वराज्यध्वजासह स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. याशिवाय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विवीध संघटना, संस्थांच्या मार्फत दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, संभाजी महाराज पुतळा डेक्कन, चंर्द्रमौलेश्वर मंदिर हडपसर, वारजे चौक, नळस्टॉप चौक, १५ अॉगस्ट चौक, शिवणे गाव, नांदेड गाव, वीर बाजी पासलकर भवन, खेड-शिवापूर अशा असंख्य ठिकाणी चौकाचौकात, गावागावात स्वराज्यगुढी उभारत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाचे आयोजन अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पायगुडे, अनिल पवार, किरण देसाई, महेश मालुसरे, रवींर्द्र कंक, गोपी पवार, समीर जाधवराव, दिग्वीजय जेधे, निलेश जेधे, मंदार मते, शंकर कडु, मयुरेश दळवी, यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com