Pune News : घोषणांचा वर्षाव; पुणे जिल्ह्यात ५३ हजार कोटींची रस्त्याची कामे

६२५ किलोमीटरच्या कामांसाठी तब्बल ५३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार
Pune News : घोषणांचा वर्षाव; पुणे जिल्ह्यात ५३ हजार कोटींची रस्त्याची कामे
esakal

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रिंगरोड, एलिव्हेटेड मार्ग, पुणे बेंगलोर, पुणे छत्रपती संभाजीनगर हे नवे प्रकल्प केले जाणार आहे.

सुमारे ६२५ किलोमीटरच्या कामांसाठी तब्बल ५३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने यासाठी जीएसटी व रॉयल्टी माफ करावी अशी विनंती केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

गडकरी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्रात नवे प्रकल्प भविष्यात केले जाणार आहेत. जेनएपीटी बंदरावर रेल्वे वाहतूक व रस्ते वाहतूक याची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे आता पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत.

दौंड, बारामतीपासून जेएनपीटी पर्यंत थेट दोन लेनची रेल्वे सुरू करावी. ही रेल्वे मुंबई, ठाण्यात जाणार नाही. त्यामुळे तेथील वाहतूक कमी होऊ शकते. यासाठी रेल्वे मंत्र्यांना भेट घेतली जाणार आहे. या प्रस्तावास अजून मान्यता मिळालेली नाही.

पुणे बेंगलोर नवीन महामार्ग केला जाणार असून, त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. हा भाग पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातून जाणार असल्याने तेथील नागरिकांना फायदा होणार आहे.

दिल्ली मुंबई कॅरीडोअरला जोडण्यासाठी विरारनंतर उड्डाणपूल केला जाणार आहे. त्यासाठी एक लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. पुणे जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रात ५३ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प केले जाणार.

यामध्ये नाशिक फाटा खेड एलिव्हेटेड कॅरीडोअर, पुणे शिरूर कॅरीडोअर, तळेगाव चाकण एलिव्हेटेड कॅरीडोअर, दिवेघाट हडपसर मार्ग, पुणे छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस वे आणि पुणे बेंगलोर एक्स्प्रेस वे ही कामे केली जाणार आहे. यासाठी सुमारे ५३ हजार कोटीचा खर्च येणार आहे.

‘‘महाराष्ट्रात पुढील काळात मोठे प्रकल्प केले जाणारआहे. त्याचा खर्च जास्त असल्याने राज्य सरकारने आम्हाला जीएसटी व रॉयल्टी माफी द्यावी अशी विनंती केली जाणार आहे. तसेच महामार्गांवर ठेकेदाराच्या रुग्णवाहिकांची सेवा चांगली नाही, अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका वेळेवर पोचाव्यात यासाठी १०८ या सेवेसोबत करार केला जात आहे.’’

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित प्रकल्प, अंतर व खर्च

प्रकल्प - अंतर - खर्च (कोटीत)

नाशिक फाटा खेड एलिव्हेटेड कॅरीडोअर - २९ - ८८४१

पुणे शिरूर कॅरीडोअर - ५७ - १००००

तळेगाव चाकण एलिव्हेटेड कॅरीडोअर - ५४ - ११०००

दिवेघाट हडपसर मार्ग - २३ - ८२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com