लोहगाव विमानतळावर 54 चेक इन काउंटर्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे - प्रवाशांच्या वाहतुकीचा एक कोटींचा टप्पा ओलांडण्याकडे वाटचाल करणाऱ्या लोहगाव विमानतळावर प्रवाशांसाठी ५४ ‘चेक इन’ काउंटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रांगेत उभे राहण्याचा प्रवाशांचा वेळ कमी होणार आहे. नव्या ‘चेक इन’मध्ये १२ ते १५ ‘किऑस’च्या माध्यमातून प्रवाशांना स्वतःला बोर्डिंग पास घेता येणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही सुविधा कार्यान्वित होईल. 

लोहगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांचीही संख्या वाढत आहे. प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा वाढविण्याशिवाय भारतीय विमानतळ प्राधिकरणासमोर पर्याय नाही. विमातळावर यापूर्वी सुमारे ३० चेक इन काउंटर होते. त्यात १२ काउंटरची नुकतीच भर पडली आहे. आता मुंबई, दिल्ली, हैदराबादमधील विमानतळांच्या धर्तीवर प्रवाशांना सेल्फ ‘चेक इन’साठी १२ ते १५ किऑस उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे चेक इन प्रक्रियेसाठी किमान ५४ काउंटर उपलब्ध होणार आहेत. त्यातील ४२ काउंटरवर प्रवाशांना मोठ्या बॅगा जमा करता येतील. किऑसच्या माध्यमातून बोर्डिंग पास घेऊन विमानात प्रवेश करता येईल. याबाबतचे काम सध्या सुरू झाले असून, येत्या १५-२० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

विमानतळावरील आसनक्षमता वाढली
विमानतळावर विमानांची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पूर्वीची १२५० आसन क्षमता अपुरी पडत होती. हे लक्षात घेऊन आता तब्बल ९०० ने आसन क्षमता वाढविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे विमानतळावर आता एकाचवेळी २१५० प्रवासी बसू शकतात. तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आता लगेज ट्रॉलीही २०० ने वाढविण्यात आल्या आहेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुण्यातून विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चेक इन काउंटर वाढविले, ही उत्तम बाब आहे. आम्हा कलाकारांना नेहमीच कार्यक्रमांसाठी वेळेत जाणे गरजेचे असते. त्यामुळे आता विमानतळावरील वेळेची बचत होणार आहे. विमानतळावर अन्य सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात.
- भार्गवी चिरमुले, अभिनेत्री

182 विमानांची रोजची उड्डाणे
20  हजार रोजचे प्रवासी
9  कंपन्यांमार्फत होतात उड्डाणे 

Web Title: 54 check in counters at Lohagao airport