पुणे जिल्ह्यात आज ५४९ नवे रुग्ण; आज ५ हजार ५६७  कोरोना चाचण्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

पुणे जिल्ह्यात  मंगळवारी  (ता. २७) दिवसभरात ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २४१ जण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण ५ हजार ५६७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आज १  हजार २३५ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात  मंगळवारी  (ता. २७) दिवसभरात ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २४१ जण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण ५ हजार ५६७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आज १  हजार २३५ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज पिंपरी चिंचवडमध्ये १२७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १११, नगरपालिका क्षेत्रात ६४  आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६ नवे रुग्ण सापडले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २२ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता. २६) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता. २७) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

धनंजय मुंडेंसमवेत विसंवाद नाही : पंकजा मुंडे 

यामुळे पुणे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख २०  हजार ६६१  झाली आहे. यापैकी 2 लाख ९९  हजार ९१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 लाख ४९ हजार ९१८ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ८३ हजार ३७४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४७ हजार ६२६, नगरपालिका क्षेत्रातील  १३  हजार ३५१  आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ हजार ६४२  जणांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत ७ हजार ७६७  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३६२ जणांचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 549 new corona patient found in pune district