esakal | Pune : पूर टाळण्यासाठी ५५ कोटी; महापालिकेचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Corporation

Pune : पूर टाळण्यासाठी ५५ कोटी; महापालिकेचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : धानोरी, विश्रांतवाडीसह शहराच्या पूर्व भागात पुराचा फटका बसल्यानंतर या भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेकडून तब्बल ५५ कोटी रुपयांची योजना हाती घेतली जाणार आहे. यामध्ये पावसाळी गटारांसह, सांडपाणी वाहिन्यांचे काम केले जाणार आहे. तसेच पाणी साचणाऱ्या ६६ ठिकाणी उपाययोजना करण्याचा निर्णय आज (सोमवारी) घेतला आहे.

हेही वाचा: कचरा टाका, पैसे कमवा! पुण्यात ४० ठिकाणी बसणार एटीएम

शनिवारी सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस पडला, पण, सर्वाधिक फटका धानोरी, येरवडा, कल्याणीनगर, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, हडपसर या भागात बसला. अनेक सोसायट्या, वस्त्या, दुकानांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षात या भागात झालेल्या अवैध बांधकामामुळे पाणी साचल्याचेही यावेळी निदर्शनास आले. यापार्श्‍वभूमीवर आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी (ता. ११) बैठक घेऊन पूरस्थिती टाळण्यासाठी निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: Katraj : मोरेबाग, सावंत विहारमध्ये पाणीसंकट; आठवडाभरापासून पाणी नाही

धानोरी व हा सर्व परिसर नव्याने विकसित झालेला आहे, तेथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटारे टाकले जाणार आहेत. तसेच सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणा चांगली केली जाणार आहे. या भागात सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा या बैठकीत घेतला. तसेच या भागात ६६ ठिकाणी पाणी साचल्याचेही निदर्शनास आले आहे. पाणी साचू नये, यासाठीही उपाय योजना केल्या जाणार आहे. अंदाजपत्रकात पावसाळी गटारे व सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून, त्यापैकी ५५ कोटी रुपये धानोरी, लोहगाव, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा यासह इतर भागासाठी दिले जाणार आहेत. या भागात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

"धानोरी व इतर भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पावसाळी व सांडपाणी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. तसेच, ६६ ठिकाणी पाणी साचत असल्याचे समोर आले असल्याने त्याठिकाणीही काम केले जाईल. यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे."

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

loading image
go to top