राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यातून ५६ तर, भोर अन् मावळमध्ये सर्वाधिक इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पुणे : पुणे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात मिळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी एकूण ५६ जण इच्छुक आहेत. यावरून राज्यात  राष्ट्रवादीत वाढलेल्या गयारामांचा पुणे जिल्ह्यात मात्र, काहीही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट दिसते आहे.

जिल्ह्यातील दहापैकी बारामतीतून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आंबेगावातून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील असे प्रत्येकी एक जणच इच्छुक आहेत त्यामुळे या दोन्ही मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. उर्वरित आठ जागांसाठी ५४ जण इच्छूक आहेत. यामध्ये भोर आणि मावळ या दोन मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी ९  जण इच्छूक आहेत.  हवेली - ६, खेड- ८; इंदापूर व दौंड प्रत्येकी - ७; पुरंदर - ५ आणि जुन्नरमधून  ३  जण मुलाखतीसाठी आले आहेत.          

दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उशीरा आल्याने नियोजित वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरु होणाऱ्या मुलाखती अकरा वाजता सुरु झाल्या. त्यामुळे मुलाखती रेंगाळल्या. आतापर्यंत फक्त भोर विधानसभा मतदारसंघातील मुलाखती पूर्ण झाल्या आता मावळ मतदारसंघाच्या सुरु झाल्या आहेत. प्रत्येक इच्छुकाची स्वतंत्र मुलाखत घेतली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 56 aspirants for NCP candidate in Pune district