ई-कचऱ्यावर सुचविले ७५६ नागरिकांनी उपाय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे  - वाढत्या ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या योजना, उपाय करता येतील याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्याच्या मुदतीचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड आयटी’कडून या सूचना मागविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण ७५६ नागरिकांनी त्यांचा प्रतिसाद संकेतस्थळावर नोंदविला आहे. 

इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांसह अन्य वस्तूंचा समावेश इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यामध्ये होतो. या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान सध्या सरकारपुढे आहे. ई-कचरा गोळा करण्यामध्ये आणि त्याच्या पुनर्वापरासाठी प्रक्रिया करण्याच्या कामात असंघटित क्षेत्रातील, विशेषतः लहान मुलांचा, कामगारांचा वापर  केला जातो.

असंघटित क्षेत्रामधून तब्बल ९५ टक्के ई-कचरा गोळा केला जातो. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील पर्यावरणीय धोके या विषयाबाबत जनजागृती करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स खात्यातर्फे उपक्रम राबविले  जात आहेत. 

Web Title: 56 people suggested measures for e-waste