सप्टेंबरपासून शाळा सुरू झाल्यास...पालक काय म्हणतात पाहा...

school.jpg
school.jpg

पुणे : सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत सध्या चर्चा सध्या चांगलीच रंगत असली तरीही कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शाळा सुरू झाली तरी आम्ही मुलांना शाळेत कसे पाठविणार!! शक्‍यतो मुलांना घरात राहूनच शिक्षण कसे देता येईल, याला प्राधान्य दिले जाईल,'' असे सांगत सुवर्णा देवकर-घोलप यांनी "सध्या तरीही मुलांना शाळेत न पाठविण्याच्या आपल्या निर्णय ठाम असल्याचे स्पष्ट केले.

खरंतर सुवर्णा या मुळात शिक्षिका आहेत, मात्र तरी देखील कोरोनाच्या काळात मुलांना शाळेत पाठविण्यास त्या इच्छुक नाहीत. काही महिने आणखी वाट पाहावी, कोरोनावर अधिकृत लस किंवा औषध असल्याचे जाहीर झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. सुवर्णा यांच्याप्रमाणेच मुलांना पुन्हा शाळेत पाठविण्यास जवळपास 58 टक्‍क्‍यांहुन अधिक पालक इच्छुक नसल्याचे "लोकल सर्कलस्‌'च्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबलेले नाही. परंतु सप्टेंबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केंद्र सरकारच्या वतीने होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पहिल्या टप्प्यात दहावी-बारावी आणि दुसऱ्या टप्प्या सहावी ते नववीचे वर्ग सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभुमीवर "लोकल सर्कल्स'च्या वतीने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात देशभरातील जवळपास 25 हजार पालकांनी सहभाग नोंदवित मते मांडली. यामध्ये पालकांना सप्टेंबरपासून शाळा सुरू झाल्यास मुलांना पुन्हा शाळेत पाठविण्यास 58 टक्के पालकांनी नकार दिला आहे. तर 33 टक्के पालकांनी शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली असून नऊ टक्के पालकांनी सांगता येत नसल्याचे नमूद केले. 

नवी सांगवीत राहणाऱ्या इंटेरिअर डिझायनर असणाऱ्या दिपाली ननावरे म्हणाल्या, "निदान पाचवीपर्यंतच्या मुलांना तरी, या संपुर्ण वर्षात शाळेत पाठविण्याचा अट्टहास करण्यात येऊ नये. शाळेमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे, संपुर्ण शाळेचे सातत्याने निर्जुंतुकीकरण करणे, हे केवळ अशक्‍य आहे.'' 

सप्टेंबरपासून शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठविणार का? 
- होय : 33 टक्के 
- नाही : 58 टक्के 
- सांगता येत नाही : 9 टक्के 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाळेत पाठविण्याला विरोधाची कारणे : 
- कोरोनाचा संसर्ग वाढत असताना; मुलांना शाळेत (समुहात) पाठविण्याचे आव्हान घेऊ शकत नाही 
- शाळेनिमित्त मुले बाहेर पडल्यास घरातील वृद्धांनाही संसर्ग होण्याची भिती 
- शाळेत "सोशल डिस्टन्सिंग' पाळणे अवघड आहे 
- शाळा सुरू झाल्यास कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरेल 
- सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षण सोयीस्कर  

असे झाले 'लोकल सर्कल्स'चे सर्वेक्षण : 
- देशभरातील 25 हजार पालकांचा सहभाग 
- 63 टक्के पुरूष आणि 37 टक्के महिलांनी नोंदविले मते 

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत जगभरात हे सुरू : 
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे शाळाही सुरू झाल्या, मात्र त्यानंतर शेकडो विद्यार्थी आणि शालेय कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझेटिव्ह आली. त्यामुळे अनेकांना "होम क्वारंटाईन' करण्याची वेळ आली. कोरोनाच्या संकट काळात शाळा पुन्हा सुरू करणारा इस्त्राईल हा पहिला देश ठरला. येथे मे महिन्यात शाळा सुरू झाल्या आणि काही दिवसांत शंभरहुन अधिक विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाबाधित झाले. लहान मुलांना कोरोनाच्या संकटापासून वाचविण्यासाठी केनियात मात्र संपूर्ण शैक्षणिक वर्ष रद्द करण्यात आले. 

देशात अनलॉक झाल्यानंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या तरी बहुतांश पालक हे मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण किंवा रेडिओ, टिव्हीद्वारे दिले जाणारे शिक्षण हे पोचत नसलेल्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) या अंतर्गत निधी उपलब्ध करून हे शिक्षण पोचविले पाहिजे.- अक्षय गुप्ता, सरव्यवस्थापक, लोकल सर्कल्स्‌ 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com