चीनच्या सीमेवर अडकले पुणे- मुंबईतील 58 पर्यटक 

मंगेश कोळपकर
सोमवार, 25 जून 2018

पुणे : ट्रॅव्हल कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पुणे, बारामती, मुंबई, बेळगाव, सांगलीमधील 58 पर्यटक चीन सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून अडकले आहेत. पुण्यातील रघुकुल ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून हे पर्यटक कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेले आहेत. संबंधित कंपनीचे नेपाळच्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना 54 लाख रुपयांचे देणे आहे. हे पैसे मिळाल्याशिवाय पुढे नेणार नाही, असे त्यांनी बजावले आहे.

पर्यटकांनी नेपाळमधील भारतीय दुतावासात संपर्क साधला आहे. तसेच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशीही संपर्क केला आहे. दरम्यान, रघुकुल ट्रॅव्हल्स कंपनीशी "सकाळ'च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, पर्यटकांची रात्रीपर्यंत व्यवस्था करून त्यांची यात्रा मार्गी लावू, असे त्यांनी सांगितले आहे. संबंधित पर्यटक नेपाळमधील काठमांडूपासून 200 किलोमीटर अंतरावर तैमूर या गावात आहेत. तेथून दीड किलोमीटरवर चीनची सीमा आहे. परंतु, पर्यटन कंपनी या पर्यटकांना पुन्हा नेपाळमध्ये येण्याचा आग्रह करीत आहे. तर पैसे भरले असून यात्रा पूर्ण केली पाहिजे, असे पर्यटकांचे म्हणणे आहे. 

Web Title: 58 tourists from pune mumbai stuck on the chin border