चास कमानचे आवर्तन बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

चास - चास कमान धरणात ५.९२ टक्के (०.४५ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. २४ जूनपासून शिरूर तालुक्‍याच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन रविवारपासून बंद करण्यात आले. 

चास - चास कमान धरणात ५.९२ टक्के (०.४५ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. २४ जूनपासून शिरूर तालुक्‍याच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन रविवारपासून बंद करण्यात आले. 

जून महिना संपला तरी पावसाने हजेरी लावलेली नसल्याने सर्वत्रच पाण्याचे दुर्भिक्ष असून, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे. खेड तालुक्‍यासह शिरूर तालुक्‍याच्या बहुतांशी भागात पावसाचे आगमनच न झाल्याने चासकमान धरणातून पाणी सोडण्याची मागणी काही दिवसांपासून सुरू झाली होती. मात्र, चासकमान धरणातील शिल्लक असलेला पाणीसाठा हा पिण्यासाठी राखीव ठेवला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय धरणातील पाणी सोडणे शक्‍य नसल्याने शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पाऊस नसल्याने उद्‌भवलेली परिस्थिती पाहता चासकमान धरणातून कालव्याद्वारे पिण्यासाठी पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार कार्यकारी अभियंता  यांना आदेश प्राप्त झाल्यावर 
२४ जूनपासून धरणातून कालव्यात पाणी सोडण्यास सुरवात झाली होती. पावसाने सर्वत्रच ओढ दिल्याने पिण्यासाठी राखीव ठेवलेले पाणी गरज पूर्ण होताच आज बंद करण्यात आले.  

पाण्याची स्थिती गंभीर होण्याची शक्‍यता
चालू वर्षी एक जूनपासून धरण परिसरात १६३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी १ जुलै २०१७ पर्यंत २६९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. धरणात २७.३९ टक्के (२.०७ टीएमसी ) पाणीसाठा झाला होता. धरण व परिसरात कडक ऊन पडत असून, पावसाची शक्‍यताच नसल्याने व धरणात पाण्याची होणारी आवक बंद झाल्याने पाण्याची स्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे.  

Web Title: 5.92% water stock in Chaskaman Dam