फुकट्यांना ६ कोटींचा दंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे - रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख १३ हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सहा कोटी २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर मार्गांवर एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात फुकट्या प्रवाशांना दंड करण्यात आला. जवळच्या अंतराचे तिकीट काढून दूरचा प्रवास करणे, जादा वजनाचे सामान बाळगणे अशा प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. अडीच लाख प्रवाशांकडून १२ कोटी २० लाख रुपयांचा 
दंड वसूल केला. 

स्थानकावर कर्मचारी आणि प्रवाशांना गुरुवारी स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, मंडळ व्यवस्थापक संजयकुमार दास, स्टेशन डायरेक्‍टर ए. के. पाठक, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळकर, सहायक आयुक्त अरुण खिलारी आदी उपस्थित होते.

Web Title: 6 Crore Fine to without ticket passenger by Railway