पावसाळ्याच्या तोंडावर शिरूर तालुक्यात सहा चारा छावण्या सुरू

takali
takali

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यात दुष्काळ पडल्याने चारा छावणीचे नियोजन करण्यात आले आहे. शासनामार्फत पशुधन वाचविण्याचे या परिसरात सहा छावण्या सुरू केल्या आहेत. या दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे हाती घेऊन बंधाऱ्यामधून निघालेला गाळ शेतकऱ्यांनी शेतामध्ये घेऊन जावा. विहिरी, कुपनलीका भुर्णभरण करत असताना पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरविण्यासाठी नागरीकांनी मदत करावे असे आवाहन शिरूर चे तहसीलदार गूरू बिराजदार यांनी केले. 

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे चारा छावणीची पहाणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, सरपंच दामु घोडे, भिमाशंकर कारखान्याचे कर्मचारी पोपट तरटे, शेतकरी उपस्थीत होते. 
तहसीलदार म्हणाले की, मलठण, पाबळ व टाकळी हाजी येथील मंडल कार्यक्षेत्रात सहा चारा छावनी सुरू करण्यात आली आहे. यासाठी चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. 34 टॅंकर व्दारे गावांना पाणी पुरवठा या परीसरात केला जात आहे. दुष्काळी परीस्थीती पहाता काही प्रमाणात सुवीधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जलसंधारणाची कामे हाती घेत असताना रोजगार हमी मार्फत कामे सुरू करत असताना नागरीकांनी सहकार्य करावे. विहीर व कुपनलीका पुर्नभरण करत असताना त्यासाठी शासन अनुदान दिले जाणार आहे. भुर्गभातील पाणी साठा वाढविण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

टाकळी हाजी व निमगाव दुडे येथील चारा छावणीची पहाणी करून यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनावरांची उपस्थीती व त्याप्रमाणे त्यांना मिळणारा चारा यावरच अनुदान दिले जाते. त्यामुळे आनलाईन जनावरांची उपस्थीती महत्वाची आहे. चारा छावनीवर जनावरांसाठी दिले जाणारे पाणी देखील यावेळी त्यांनी स्वतः पिऊन पाहिले. उत्तम पाणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com