बारामती: तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 60 लाखांचा निधी

संतोष आटोळे 
बुधवार, 4 एप्रिल 2018

शिर्सुफळ - जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील तीन ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांसाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी दिली.

बारामती तालुक्यामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन तालुक्याचा सर्वांगीण विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन तालुक्यातील तीन तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शिर्सुफळ येथील शिरसाई देवस्थान येथे भक्त निवास बांधणे (20 लाख), कटफळ येथील जानाईदेवी देवस्थानसाठी भक्त निवास  बांधणे (20 लाख), व लाटे येथील आईसाहेब संजिवनी समाधी देवस्थान भक्त निवास बांधणे (20 लाख) निधी मंजूर झाला आहे. यामुळे सदर तीर्थक्षेत्र स्थळांवर भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

Web Title: 60 lakhs funds for pilgrimage development