प्राधिकरण बांधणार सहा हजार घरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

तीन गृहप्रकल्पांसाठी ३२५ कोटींची तरतूद; ६७९ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी 
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात प्रमुख तीन गृहप्रकल्पांसाठी ३२५ कोटींची तरतूद केली आहे. या प्रकल्पांमध्ये सहा हजार १४२ घरे बांधली जाणार आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ६७९ कोटी ८९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प प्राधिकरणाच्या सभेत मंगळवारी (ता. २२) चर्चेअंती मंजूर करण्यात आला.

पाच कोटी २७ लाखांच्या शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सभेत हा अर्थसंकल्प सादर केला. अध्यक्षस्थानी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांनी विभागप्रमुखांच्या सहाय्याने हा अर्थसंकल्प तयार केला आहे. 

प्राधिकरणातर्फे १४ हजार ६५६ घरे उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील दोन वर्षांमध्ये वाल्हेकरवाडी (पेठ क्रमांक ३० व ३२) गृहप्रकल्प, पेठ क्रमांक ६ आणि १२ येथील गृहप्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन आहे. संबंधित गृहप्रकल्पातून सहा हजार १४२ घरे उपलब्ध होणार आहेत. पेठ क्रमांक १२ वगळून पेठ क्रमांक १ ते २२ मधील गृहयोजना (दहा कोटी), विविध पेठांतील गृहप्रकल्प (पाच कोटी), पेठ क्रमांक ३० व ३२ मधील गृहयोजनेतील व्यापारी भूखंडाचा विकास - (पाच कोटी), असा खर्च होणार आहे.

प्राधिकरणातर्फे एकूण १४ हजार ६५६ घरे उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील दोन वर्षांमध्ये तीन गृहप्रकल्पांतून सहा हजार १४२ घरे उपलब्ध होतील. खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी कामाचे आदेश दिले आहेत. 
- सदाशिव खाडे, अध्यक्ष, प्राधिकरण

प्रमुख विकासकामे (कोटी रुपयांत)
  आठ रस्ते व साई चौक उड्डाण पूल  :  ४४.७१
  आंतरराष्ट्रीय खुले प्रदर्शन केंद्र : ४४.८१ 
  हेलिपॅड उभारणी : १
  पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्‍यना केंद्र  : ५ 
  जे.आर.डी.टाटा यांचे स्मारक व औद्योगिक संग्रहालय, विरंगुळा केंद्र व ओपन जीम - ८  
  पेठ क्रमांक ५ व ८ येथे सोलर पार्कची उभारणी :  १ (२ मेगावॉट विजेची निर्मिती)
   चिंतामणी चौक ते पॉवर हाउस २४ मीटर रुंद रस्ता - ५
  पेठ क्रमांक २५ मधील सांस्कृतिक भवन बांधणे/दुरुस्ती - ५
  पेठ क्रमांक ७ व १० मध्ये फॅसिलिटी सेंटर, नाईट शेल्टर, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह : ५

Web Title: 6000 home construction by pradhikaran