बारामतीत संचालक बनविण्याच्या आमिषाने 62 लाखांची फसवणूक

संशयीतासह त्याच्या बहिणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला
 फसवणूक!
फसवणूक!Sakal

बारामती - हेअर प्रॉडक्ट कंपनीत संचालक म्हणून घेतो असे सांगून एका भामट्याने बारामतीमधील तुषार ओंबासे यांना तब्बल 62 लाख 57 हजारांना गंडा घातला. या प्रकरणी फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रवीण सदाशिव भिसे (मूळ रा. रेडणी, ता. इंदापूर) याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टाईम फॉर इंडिया या नावाने उत्पादने शेअर करणारी कंपनी स्थापन करुन नफा मिळवून देतो, त्यात तुम्हाला संचालक करतो असे सांगत तुषार यांचा विश्वास संपादन केला.

2020 ते 2021 दरम्यान आरटीजीएसच्या माध्यमातून 62 लाख 57 हजार रुपये घेत त्याने फसवणूक केल्याची फिर्याद तुषार यांनी दाखल केली आहे. हे पैसे त्याने आपल्या आयसीआयसीआय बँकेत कामाला असलेल्या बहिणीच्या नावावर घेतले. त्यामुळे यात सदर बहिणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकारानंतर प्रवीण भिसे पुण्यात स्वताःचा पत्ता बदलून राहत होता. पोलिस अधीक्षकांकडे या बाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ सूत्रे हलवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दांडीले, रामचंद्र शिंदे, तुषार चव्हाण, अजित देवकर यांनी गोपनीय माहिती काढून भल्या पहाटे प्रवीण सदाशिव भिसे यांना पुण्यातून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com