शहरात पार्किंगसाठी 62 प्लॉट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - शहरातील पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 62 प्लॉट विकसित करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी "बांधा, वापरा आणि हस्तांतर करा' (बीओटी) हादेखील एक पर्याय आहे. विकसित केलेले पार्किंग पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच शुल्क भरून रस्त्यावर वाहन पार्क करता येणार आहे. 

शहरातील नव्या पार्किंग धोरणावरून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे पार्किंग धोरणाच्या प्रस्तावाला उपसूचना देत संपूर्ण शहराऐवजी पाच प्रमुख रस्त्यांवर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पालकमंत्री गिरीश बापट यांनी "सकाळ' कार्यालयाला दिलेल्या भेटीत पार्किंग धोरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ""शहरातील वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित असलेले 62 प्लॉट विकसित केले जाणार आहेत. हे पार्किंग पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच चालकांना रस्त्यावर शुल्क भरून वाहन पार्क करावे लागेल.'' 

ते म्हणाले, ""पुणेकरांच्या दृष्टीने पाणी आणि वाहतूक हे ज्वलंत प्रश्‍न आहेत. वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्यामुळे हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. पार्किंग धोरण हा त्याचाच एक भाग आहे. शहरात यापूर्वीही एकदा पार्किंग धोरण केले होते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर आता पार्किंग धोरण निश्‍चित करताना व्यावहारिकता आणि जनमानस यांचा विचार करून निर्णय घेण्यात येत आहे.'' 

""शहरात सध्या पार्किंगसाठी 62 प्लॉट आरक्षित आहेत. हे पार्किंग प्लॉट विकसित करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे "बीओटी' तत्त्वावर ते विकसित करून पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देता येतील. त्यातून शहरातील पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्याच्यादृष्टीने पाऊल टाकले जाईल. त्याबाबत महापालिकेची तातडीने बैठक बोलावली जाईल,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

""धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी यांच्यात एकवाक्‍यता झाली पाहिजे. वृत्तपत्रांनीदेखील यात सक्रिय सहभागी झाले पाहिजे,'' अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली. 

बापट म्हणाले... 
- व्यावसायिक वाहनांच्या पार्किंगवर लक्ष केंद्रित करणार 
- रस्त्यांवर उभ्या असलेल्या कालबाह्य वाहनांवर कारवाई करणार 
- पार्किंग नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार 
- वाहन पार्किंगसाठी चालकांमध्ये शुल्क देण्याची मानसिकता निर्माण करण्यावर भर 

Web Title: 62 plots for parking in the city