"पीएफ' न भरणाऱ्या शहरात 622 कंपन्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पिंपरी  - कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये लहान मोठ्या सर्व कंपन्यांनी स्वतःचा हिस्सा भरणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेक कंपन्या ही रक्‍कम भरतच नाहीत. पिंपरी-चिंचवड परिसरातील अशा 622 कंपन्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाने शोधून काढल्या आहेत. या कंपन्यांची 800 बॅंक खाती सील करून त्यामधून एक कोटी 32 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पीएफ कार्यालयाचे विभागीय आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी "सकाळ'ला दिली. गेल्या आर्थिक वर्षात ही कारवाई करण्यात आली आहे. 

ते म्हणाले, ""कंपनीत काम करीत असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याच कर्मचाऱ्यांची पीएफची रक्‍कम भरली जाते. उर्वरित रक्‍कम भरलीच जात नाही. असे प्रकार लक्षात आल्याने पीएफ कार्यालयाकडून अशा कंपन्यांचा शोध घेण्याचे काम सातत्याने सुरू असते. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये शहरातील 600 हून अधिक कंपन्यांनी पीएफची रक्‍कम न भरल्याचे निदर्शनाला आले. त्या कंपन्यांना पीएफ कार्यालयाकडून रक्‍कम भरण्याची नोटीस देण्यात आली होती. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्या कंपन्यांची बॅंक खाती सील करून ही रक्‍कम वसूल करण्यात आली आहे. 

अनेक दिवसांपासून पीएफची रक्‍कम थकीत ठेवणाऱ्या 50 ते 60 कंपन्यांकडून गेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी 67 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. दोन ते तीन महिन्यांची पीएफ रक्‍कम थकीत ठेवणाऱ्या कंपन्यांकडून एक कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मार्च महिन्यात पीएफची रक्‍कम थकीत ठेवणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये 51 लाख 33 हजार रुपयांची वसुली करण्यात आल्याचे अमिताभ प्रकाश यांनी नमूद केले. 

""भविष्यनिर्वाह निधीची (पीएफ) रक्‍कम भरण्यासाठी वारंवार नोटिसा पाठवल्या. तरीही थकीत रक्‍कम न भरणाऱ्या पाच ते सहा जणांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 
अमिताभ प्रकाश, विभागीय आयुक्‍त, पीएफ कार्यालय 

Web Title: 622 companies in non-PF cities