पुणे विद्यापीठाने अधिसभेत मांडला ६३३ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : संशोधन व गुणवत्ता सुधार, विद्यार्थी विकास यांसह विविध योजनांसाठी भरीव तरतूद करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१९-२० या वर्षाचा तब्बल ६३३ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प शनिवारी अधिसभेत मांडण्यात आला.​

पुणे : संशोधन व गुणवत्ता सुधार, विद्यार्थी विकास यांसह विविध योजनांसाठी भरीव तरतूद करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१९-२० या वर्षाचा तब्बल ६३३ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प शनिवारी अधिसभेत मांडण्यात आला.

२०१९-२०च्या अर्थसंकल्पातील नवीन तरतूद :
- पदवी प्रदान समारंभ सभागृह : 3 कोटी रुपये
- पुस्तक पुनर्प्रकाशन : १० लाख रुपये
- सावित्रीबाई फुले पोस्ट डॉक्टरल फेलोशिप : २ कोटी रुपये
- ह्यूमानिटीज मिरिट फेलोशिप : ५ लाख रुपये
- रिसर्च पार्क : ४५ लाख रुपये
- विद्यापीठ आवारातील बांधकामासाठी ५३कोटी ३७लाख रुपये
- गुणवत्ता सुधार कार्यक्रमासाठी १८कोटी २०लाख रूपयांची स्वतंत्र तरतूद
- विद्यार्थी विकासासाठी ३३.५८ कोटी रुपये

२०१९-२०च्या अर्थसंकल्पात खर्चाची टक्केवारी: 
- वेतन (राज्य सरकार अनुदानित) : २०टक्के
- वेतन ( विनाअनुदानित) : १०टक्के
- प्रशासकीय विभाग : ३ टक्के
- विद्यार्थी सेवा व सुविधा : ३८ टक्के
- शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम : ३ टक्के
- पायाभूत सेवा : ६ टक्के
- इमारत बांधकामे, सुविधा, सुधारणा : १० टक्के
- स्वतंत्र  प्रकल्प व योजना : १० टक्के

Web Title: 633 crore rupees budget presented by Pune University