पुणेकरांची लाडकी फुलराणी" झाली 63 वर्षांची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते फुलराणीच्या आकाराचा केक कापण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या चिमुकल्यांनी आणि अग्रवाल यांनी पालकांसह फुलराणीची सफर अनुभवली. वर्धापण दिनानिमित्त फुलराणीला फुगे आणि रेबिन लावून सजवल्यात आले होते. 63 वर्षानंतरही त्याच रुबाबात तिने उपस्थितांना उपस्थितांना प्रवास घडला. 

उपायुक्त नितीन उदास, मुख्य उद्यान अधीक्षक संतोष कांबळे, विद्युत विभागाचे प्रकाश कोल्हापूरकर, स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता कदम गोपाळ भंडारी,  वाहतूक अधीक्षक ऋषिकेश चव्हाण, उद्यान निरिक्षक सर्जेराव काळे, पर्यवेक्षक सुभाष पारठे, इन्चार्ज विलास पाठक यांच्यासह उद्यानातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 गेली 63 वर्ष कोणताही खंड पडू न देता फुलराणीचा वर्धापनदिन साजरा केला जातो यातून पुण्याच्या संस्कृतीचा प्रत्यय येतो. या पुढील काळात देखील असेच उपक्रम सुरू राहतील यावर्षीच्या बजेटमध्ये उद्यानांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून त्यातून अनेक सुविधा नागरिकांना पुरवल्या जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त अग्रवाल यांनी सांगितले.

''फुलराणी सुरू झाली त्या दिवशी देखील मी तिथेच होतो. तेव्हापासूनचा तिचा प्रवास मी अनुभवला आहे. नातवांना घेऊन बऱ्याचदा मी या ठिकाणी येतो'',असे दिवाकर गोडबोले यांनी सांगितले. 

fulrani
मुले मोबाईल विसरतात
घरात असतील तर मुलांचा बराचसा वेळ मोबाईल मध्ये गेम खेळण्यात जातो. मात्र उद्यानात आल्यानंतर मुले आणि पालक दोघेही मोबाईल विसरतात आणि ते येथेच मस्तीत रमतात अशी माहिती काळे आणि पाठक यांनी दिली.

Web Title: 63rd Anniversary of FulRani celebrated in Pune