इंदापूर तालुक्यासाठी टंचाई निवारण्यासाठी 64 लाख रुपयांचा निधी

राजकुमार थोरात
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे  सन 2018-19 मध्ये टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्यामध्ये टंचाईवरती मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यासाठी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी  परस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळावरती मात करण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून तालुक्यातील आठ गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये वकिलवस्ती, सराटी, उद्घट व निरवांगी गावासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये, हिंगणगाव गावसाठी 7 लाख रुपये पळसदेव, गोंदी व म्हसोबाचीवाडी गावासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये मंजूर झाले आहेत.  

सहा गावामध्ये विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी आठ लाख रुपये मंजूर झाले असून यामध्ये निमसाखर गावासाठी 3 लाख रुपये, वडापुरी, कौठळी, सराफवाडी, निंबोडी, पंधारवाडी या गावासांठी प्रत्येकी 1 लाख रुपये मंजूर झाले आहेत. व तालुक्यातील 26 गावातील विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच 83 गावामध्ये 195 विंधन विहिर खोदण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत  असून लवकरच या कामासाठी निधी दुसऱ्या टप्यामध्ये निधी मंजूर करण्‍यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Web Title: 64 lakhs fund for indapur tehsil