जुन्नरला नगर पालिकेचे 65 कर्मचारी संपात सहभागी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

जुन्नर : जुन्नर नगर पालिकेच्या 65 कर्मचाऱ्यांनी आज मंगळवार (ता.1)  बेमुदत काम बंद आंदोलनात सहभाग घेतला असल्याची माहिती जुन्नर नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अमित रोकडे व कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. 

आज सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर पालिका कार्यालयासमोर बसून काम बंद आंदोलन सुरू केले. नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर झालेल्या निर्णयानुसार सरकारकडून अंमलबजावणी न झाल्याने नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 16 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच अन्य 23 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Web Title: 65 employees Participant in Junnar municipal corporation