अबब ! औंध परिसरात कोरोना रूग्णांची संख्या साडेसहाशेच्या पार

Coronavirus.jpg
Coronavirus.jpg

औंध (पुणे) : औंध, बोपोडी, पाषाण, सुतारवाडी, सूसरस्ता, बाणेर या परिसरातील वाढती रुग्णसंख्या येथील नागरिकांसाठी चिंतेची बाब बनत चालली आहे. सध्या औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत साडेसहाशे रुग्ण संख्येचा टप्पा पार झाला आहे. एकवेळ ग्रीन झोनमध्ये असलेल्या या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत परिसरातील रुग्ण संख्या  झपाट्याने वाढत असून एकूण रुग्णांची संख्या ६५२ पर्यंत पोहचली आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे तर तीनशे शहाऐंशी जणांना डिस्चार्ज दिला आहे व दोनशे एकोणसाठ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

प्रभाग क्रमांक आठ (औंध बोपोडी) मध्ये एकूण पाचशे बेचाळीस रुग्ण सापडले आहेत. यापैकी तीनशे छत्तीस जणांना डिस्चार्ज दिला आहे व सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोनशे जणांवर उपचार सुरू आहेत. त्या तुलनेत प्रभाग क्रमांक नऊ (बाणेर, बालेवाडी, पाषाण) परिसरातील रुग्ण संख्या कमी आहे. येथे आजपर्यंत एकूण एकशे दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला असून पन्नास जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकोणसाठ जणांवर उपचार सुरू आहेत. आठ व नऊ या दोन प्रभागाच्या तुलनेत प्रभाग आठमध्ये झोपडपट्टी व दाट लोकवस्तीचा भाग येत असल्याने बोपोडीत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत आहे. यामध्ये सर्व्हे क्रमांक २४, २५, २६ भोईटे वस्ती, नाईक चाळ, बोपोडी गावठाणासह परिसरातील काही सोसाट्यांतही रुग्ण सापडले आहेत. औंध गावठाण, डॉ. आंबेडकर वसाहत, औंध रस्ता, चव्हाण नगर या भागात काही रुग्ण आढळून आले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 बाणेर येथील सोसायट्या व  गावठाणासह
पाषाण परिसरातील पाषाण गावठाण, सुतारवाडी, सूस रस्ता परिसरातील सोसायटीत काही रुग्ण आढळून आले आहेत. एवढी संख्या वाढूनही नागरिक नियमांचे पालन न करता बिनधास्तपणे गर्दी करत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी  मास्क न वापरता फिरणारे, सुरक्षित अंतर न पाळणारे  व  या परिस्थितीत  सरकारी नियमांचे उल्लंघन करुन फिरणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तरच इतरांना वचक बसेल अशा प्रतिक्रिया काही नागरिकांकडून  येत आहेत. या परिस्थितीत क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कोरोनाचे संक्रमण होऊन रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतांना नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com