सनईच्या मंगल सुरांनी ६६ व्या सवाई महोत्सवाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे : प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सनईच्या मंगलमय सुरांनी ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैदानावर सुरूवात झाली. महोत्सवाला सुरूवात करताना कल्याण अपार यांनी राग गावती सनईवादनातून सादर केला. त्यांना नवाज मिरजकर व संजय अपार यांनी तबल्यावर, अनिल तोडकर, शेखर परांजपे आणि निवृत्ती अपार यांनी सनईवर साथ केली. सूरपेटीवर जगदीश आचार्य, स्वरमंडळावर तुळशीराम अतकरे, तानपु-यावर वैष्णवी अवधानी आणि वैशाली कुबेर यानी साथ केली.

पुणे : प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सनईच्या मंगलमय सुरांनी ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैदानावर सुरूवात झाली. महोत्सवाला सुरूवात करताना कल्याण अपार यांनी राग गावती सनईवादनातून सादर केला. त्यांना नवाज मिरजकर व संजय अपार यांनी तबल्यावर, अनिल तोडकर, शेखर परांजपे आणि निवृत्ती अपार यांनी सनईवर साथ केली. सूरपेटीवर जगदीश आचार्य, स्वरमंडळावर तुळशीराम अतकरे, तानपुऱ्यावर वैष्णवी अवधानी आणि वैशाली कुबेर यांनी साथ केली.

कल्याण अपार यांनी संत एकनाथांचे आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले 'माझे माहेर पंढरी' हे भजन देखील सनईवादनातून सादर केले. त्यांना माऊली टाकळकर यांनी (टाळ) साथ केली.

त्यानंतर रवींद्र परचुरे यांचे गायन झाले. त्यांनी राग भीमपलासने आपल्या गायनास सुरूवात केली. त्यांनी गायलेल्या 'श्री' रागातील बहारदार बंदिशींना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परचुरे यांना प्रवीण करकरे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शिवदीप गरूड व सुकृत गोंधळेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.sawai gandharav

पं. बसंत काब्रा यांच्या अवीट गोडीच्या सरोद सुरांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची संध्याकाळ रंगली. पं. काब्रा यांनी त्यांचे सादरीकरण त्यांच्या गुरू आणि ज्येष्ठ सतारवदक अन्नपूर्णा देवी यांना समर्पित केले. त्यांनी सरोदवर राग पुरिया धनश्री सादर केला. त्यांना सुधीर पांडे (तबला), अखिलेश गुंदेचा (पखावज) आणि पर्व तपोधन (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

sawai

या वर्षीच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या सतीश पाकणीकर यांनी केलेल्या ‘थीम कॅलेंडर’चेही या वेळी प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी, शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि उदय भवाळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. नागराज राव हवालदार यांनी लिहिलेल्या ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी- द व्हॉईस ऑफ द पीपल’ या पुस्तकाचेही या वेळी प्रकाशन करण्यात आले.
sawai 2

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने भीमसेन स्टुडिओज या नावाने एक यू-ट्यूब चॅनल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त मुकुंद संगोराम यांनी बुधवारी महोत्सवाच्या अंतरंग या कार्यक्रमात दिली. या खास यू-ट्यूब चॅनलवर कलाकारांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार असून कलाकार कसा घडतो हे त्यातून रसिकांसमोर उलगडणार आहे.    
sawai

Web Title: 66th Sawaiyya Festival begins at Sunny Mangal Sur