Vidhan Sabha 2019 : जिल्ह्यात ६९ लाखांची रोकड जप्त

Money
Money

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात भरारी पथके आणि स्थिर पथकांकडून करण्यात आलेल्या कारवाईत ६९ लाख ५० हजारांची रोकड जप्त केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर ५० हजारांहून अधिक रोख रक्‍कम बाळगणाऱ्यांवर भरारी पथके आणि स्थिर पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे. १८ ऑक्‍टोबरअखेर भरारी पथकांकडून साडेनऊ लाख रुपये आणि स्थिर पथकांकडून ६० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. पर्वती मतदारसंघात चार वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत २१ लाख २२ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत; तसेच सर्वाधिक ३० लाख रुपये इतकी रक्‍कम दौंड मतदारसंघात जप्त करण्यात आली. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com