पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारे चार ते पाच प्रमुख पुल सुरक्षिततेच्यादृष्टीने बंद करण्यात आले.
 

पुणे : मुळा नदी दुथडी भरुन वाहू लागल्याने शहारातील काही पुल पाण्याखाली गेले आहेत तर काही पुल सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारे चार ते पाच प्रमुख पुल सुरक्षिततेच्यादृष्टीने बंद करण्यात आले.
Rain1
परिणामी दोन्ही शहरांमध्ये नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त लाखोंच्या संख्येने ये-जा करणाऱ्या नागरीकांना घरी माघारी परतावे लागले. चार ते पाच पुल बंद झाल्यामुळे बहुतांश वाहतूकीचा ताण बोपोडी व बालेवाडी येथील पुलांवर आला. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. 
rain 2

पुणे शहरातील हे पुल वाहतूकीसाठी बंद
1 महादजी शिंदे पुल (डिमार्ट औंध ते सांगवी रस्ता)
2 राजीव गांधी पुल ( औंध ते सांगवी मार्ग)
3. जुना सांगवी पुल ( सुपर कॉलेज ते जुनी सांगवी)
4. दापोडी ते बोपोडी (भाऊ पाटील रस्ता)
5. बाबा भिडे पुल 
6. होळकर पुल 
7. टिळक पुल 
rain 3


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this 7 Bridge are closed due to floods today Pune