सुळक्‍यांसह सात गड-किल्ले सर

नाशिक - सेलबारी रांगेवरील मांगी-तुंगी सुळका सर करणारे साह्यकडा ॲडव्हेंचर्स प्रतिष्ठानचे गिर्यारोहक.
नाशिक - सेलबारी रांगेवरील मांगी-तुंगी सुळका सर करणारे साह्यकडा ॲडव्हेंचर्स प्रतिष्ठानचे गिर्यारोहक.

पिंपरी - सह्याद्री पर्वतरांगेमधील नाशिक जिल्ह्याच्या बागलाण प्रांतात असलेल्या एक हजार ५६७ मीटर एवढ्या सर्वाधिक उंचीच्या साल्हेर किल्ल्यासहीत रतनगड, सालोटा, मुल्हेर आदी एकूण सात गड-किल्ले आणि मांगी-तुंगी हे दोन सुळके साह्यकडा ॲडव्हेंचर्स प्रतिष्ठानच्या १६ गिर्यारोहकांनी नुकतेच सर केले. ही कामगिरी त्यांनी अवघ्या पाच दिवसांत फत्ते केली.

संस्थेचे मुख्य मार्गदर्शक बाबाजी चौधरी यांनी बागलाण प्रांतातील दुर्ग मोहिमेचे नेतृत्व केले. श्रीराम पवळे, किरण पोतले, शैलेश मेमाणे, श्रीकांत लोमटे, सुरेश अहिरे, अश्‍विनी अहिरे, प्रगती चौधरी, विराज चौधरी, विक्रांत चौधरी, धनराज मोझे, सुशील बोबडे, किरण दौंडकर, चंद्रकांत आवटे, बाबासाहेब आव्हाड, हर्षद पाटील यांनी मोहिमेत भाग घेतला. आठवर्षीय बालगिर्यारोहकापासून ५८ वर्षांच्या अनुभवी तसेच नवोदित गिर्यारोहकांनी मोहीम उत्साहाने पार पाडली. 

बागलाण प्रांताच्या सटाणा तालुक्‍यात सेलबारी आणि डोलबारी पर्वतरांगा पूर्व-पश्‍चिम पसरलेल्या आहेत. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी आणि तांबोळ्या हे सुळके आहेत. मांगी-तुंगी सुळक्‍यांपर्यंत जाण्यासाठी सुमारे तीन हजार ६०० पायऱ्या चढाव्या लागतात. या सुळक्‍यांच्या पोटात जैन आणि हिंदू लेण्या कोरल्या आहेत. याच रांगेवर न्हाया ऊर्फ रतनगड (१२५३ मीटर) हा सुळके वजा किल्ला आहे. डोलबारी रांगेत साल्हेर (१५६७ मीटर), सालोटा (१३५० मीटर), हरगड, मुल्हेर आणि मोरा हे (१३०६ मीटर) बेलाग किल्ले आहेत. त्याच परिसरात भिलाई (१०६० मीटर) हा किल्ला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com