कुदळवाडीत भंगाराची सात गोदामे खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

चिखली - कुदळवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत भंगार मालाची सात गोदामे जळून खाक झाली. आग लागलेल्या गोदामाशेजारीच ऑइलची कंपनी होती. या कंपनीच्या मागच्या भागालाही आग लागली. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावून प्रथम कंपनीला लागलेली आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी पाच बंब व स्थानिक नागरिकांचे पाण्याचे दहा टॅंकरच्या साह्याने भंगार मालाच्या गोदामाला लागलेली आग बुधवारी पहाटे आटोक्‍यात आणली. 

अग्निशामक दल आणि प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडीत आग लागण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चिखली-मोशी रस्त्यावरील चौधरी वजन काट्याजवळ भंगार मालाच्या गोदामाला आग लागली. दोन गोदामांमध्ये पत्र्याच्या भिंती असल्याने ही आग शेजारील ऑइलचे पिंप साठवलेल्या गोदामाला लागली. आग लागल्याने ऑइलच्या पिंपानी पेट घेऊन ते इतरत्र पसरत होते. पिंप पेटल्यावर मोठा आवाज होऊन ते इतरत्र उडून पडत होते. त्यामुळे शेजारच्या सात गोदांमानीही पेट घेतला. आग लागलेल्या गोदामाशेजारीच ऑइलची कंपनी आहे. पिंप उडून पडत असल्याने या कंपनीच्या पाठीमागील भागाने पेट घेतला. या कंपनीत तेलाचा मोठा बॅरल होता. कंपनीच्या सिमा भिंतीला आग लागताच मोठा अनर्थ घडेल या भीतीने नागरिक जीव मुठीत धरून वाट दिसेल त्या दिशेने सैरावैरा पळत सुटले. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठे धैर्य दाखवून कंपनीच्या मागील भागातील आग विझविली. त्यानंतर बुधवारी पहाटे गोदामांची आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. आगीमुळे सर्व परिसर धुराने माखला होता. दरम्यान, भंगारमालाच्या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा असल्याने बुधवारी दिवसभर परिसरात धूर दिसत होता. 

Web Title: 7 godowns fire in Kudalwadi

टॅग्स