डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (ता. 14) शहरातील कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, अशी माहिती सहआयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी दिली. 

येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांची जयंती आहे. त्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मिरवणुका निघतात. पिंपरी, पुणे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय चौक आणि लष्कर भागात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हे लक्षात घेऊन शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व पोलिस ठाण्यांतील सुमारे चार हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तात सहभागी असतील. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बंदोबस्तावर देखरेख असेल. मिरवणुका, पुतळ्यांच्या परिसरात सुमारे 2650 जादा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही बंदोबस्ताला पोलिसांना मदत करण्यासाठी बोलविण्यात आल्या आहेत. गृहरक्षक दलाचे 300 जवान पोलिसांबरोबर काम करतील, अशी माहिती कदम यांनी दिली. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही बंदोबस्तावर देखरेख करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: 7 thousand police for ambedkar jayanti in pune