७ वर्षाच्या चिमुकलीने लिंगाणा सुळका सर केला.

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील स्वानंदी सचिन तुपे (वय ७) हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा घेवून रविवारी (ता. २०) लिंगाणा सुळका सर केला. स्वानंदी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांची मुलगी आहे. वडिलांच्या ट्रेकिंगची आवड पाहून स्वानंदीनेही पाचव्या वर्षापासून तिने ट्रेकिंगला सुरुवात केली आहे.

 सकाळी ६ ते १० या चार तासांच्या वेळेत स्वानंदीने ३ हजार १०० फुट उंचीचा व रायगड, राजगड आणि तोरणा किल्याच्या मध्यभागी असलेला लिंगाणा सुळका सर केला. यावेळी तिच्यासोबत तिचे वडील सचिन तुपे, गिर्यारोहक अनिल वाघ व संदीप आजबे होते. दरम्यान मागील दीड वर्षामध्ये स्वानंदीने शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, कलावंतीण, प्रतापगड, सिंधुदूर्ग, विजयदुर्ग, देवगड, कुलाबा असे एकूण १० किल्ले सर केले असून आगामी काळात गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीची शंभरी गाठण्याचा तिने निश्‍चय केला आहे.

स्वानंदी प्रत्येक रविवारी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामदरा शिवालय ते झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील ज्वाला मारुती मंदिरापर्यंतचे व सोनोरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतील मल्हारगड पर्यंतचे ट्रेकिंग नियमितपणे पूर्ण करते. अगदी कमी वयामध्ये अनेक किल्ल्यांचे ट्रेकिंग पूर्ण करणाऱ्या स्वानंदीचे सोशल मिडीया व सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Web Title: 7 year girl completed difficult treak of lingana