युवा मैत्री फाऊंडेशनतर्फे ७० डस्टबिनचे वाटप

रामदास वाडेकर
शनिवार, 17 मार्च 2018

टाकवे बुद्रुक : युवा मैत्री फाऊंडेशनच्या वतीने वाहनगावात सुमारे ७० डस्टबिन वाटप केले. एक घर एक डस्टबिन या उपक्रमा अंतर्गत हे वाटप करण्यात आले. मैत्री युवा फाऊंडेशनच्या वतीने 'स्मार्ट व्हिलेज 'ही संकल्पना येथे राबवली जात आहे. या अनुषंगाने या कार्यकर्त्यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वेला गावात जाऊन स्वच्छता केली. 

तत्पूर्वी गावातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा व भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता फेरी काढून, स्वच्छतेची जनजागृती केली. गावातील महिलांनी घरातील केर  कचरा काढून रस्त्यावर न टाकता हा कचरा डस्टबिन मध्येच टाकावे असे आवाहन करण्यात आले. 

चंद्रकांत कांबळे, मिराज खान, अभिजित नाणेकर, आकाश लोंढे, प्रथमेश राऊत, दिपक पडवळ, यश शेवकर, चिन्मय घुले, महेश भागीवंत आदि उपस्थितीत होते. दत्तात्रेय पडवळ, नाना तरस यांनी सहकार्य केले. तेजस बोऱ्हाडे यांनी स्वागत केले. अल्तमेश सय्यद यांनी प्रास्ताविक केले. संदीप नेहे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश बधाले यांनी आभार मानले.  

Web Title: 70 dustbin distributed by yuva maitri foundation