इंदापूर तालुक्याच्या सहा गावांमध्ये विकासकामांसाठी ७० लाखांचा निधी : माने

राजकुमार थोरात
बुधवार, 2 मे 2018

इंदापूर तालुक्यातील सहा गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील सहा गावांमध्ये नागरी
सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

तालुक्यातील सहा गावांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. पळसदेवमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्यासाठी 10 लाख सणसरमध्ये बाजारतळावर आठवडे बाजारासाठी कट्टे बांधण्यासाठी 10 लाख, बिजवडी गावामध्ये गागरवस्ती गावठाण, काळील गुजरवस्ती, पोदकुलवाडी शाळा चौक, हनुमानमंदिर, दादाराम काळीलवस्ती, सुभाष शिंदे या सर्व ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यासाठी दहा लाख, सणसरमध्ये ग्रामपंचयात कार्यालय, भोईटे वस्ती, विठ्ठलनगर, हिंगणेवस्ती, छत्रपती हायस्कूल, सणसर ओढा येथे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी दहा लाख रुपये, भिगवणमध्ये चौक सुशोभीकरण व गटर बांधकाम करणे, बाेरीमध्ये भिसेवस्तीअंतर्गत रस्ता कॉक्रींटीकरण करणे, कळसमध्ये कळस चौकामध्ये व बाजारतळावरती हायमास्ट दिवे बसविणे या प्रत्येक कामासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती प्रवीण माने यांनी दिली.

Web Title: 70 lakhs funds for various development works in six villages in Indapur taluka