ऑनलाइन शिक्षणाबद्दल तब्बल ७० टक्के विद्यार्थी असमाधानी

सम्राट कदम
शनिवार, 11 जुलै 2020

लॉकडाउनच्या काळात देशभरातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यास सुरवात केली. परंतु तांत्रिक अडचणींबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादाचा अभाव, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि प्रयोगशीलतेचा अभाव आदी मर्यादांमुळे ही पद्धत नापास झाली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) देशभरात घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

पुणे - लॉकडाउनच्या काळात देशभरातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यास सुरवात केली. परंतु तांत्रिक अडचणींबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादाचा अभाव, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि प्रयोगशीलतेचा अभाव आदी मर्यादांमुळे ही पद्धत नापास झाली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) देशभरात घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयआयटीच्या ४० संशोधकांचा ऑनलाइन शिक्षणावरील हा अहवाल ‘आर्काईव्ह’ या प्रिप्रींट जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. तब्बल ७० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले असून, फक्त १८ टक्के प्राध्यापकांना ऑनलाइन शिक्षण भविष्यात महत्त्वपूर्ण ठरेल असे वाटत आहे. स्वयंअध्ययन, शिकण्यासाठी वेळेचे आणि जागेचे स्वातंत्र्य, असे काही फायदे असले तरी ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा, इंटरनेट, मोबाईल, संगणक, डेटा स्पीड यांचा अभाव, तसेच गृहपाठ, प्रयोगशाळा, प्रकल्प आणि वर्गातील वातावरणाची अनुपलब्धता यामुळे ऑनलाइन शिक्षण फक्त ‘प्रयोगा’पुरतेच मर्यादित राहणार असून, दीर्घकाळ ते वर्गातील फळ्याची जागा घेईल असे तरी सध्या दिसत नाही.

Image may contain: one or more people, text that says "ऑनलाइन शिकविण्याचा विद्यार्थ्यांचा वर्गाच्या तुलनेत प्राध्यापकांचा अनुभव ऑनलाइन तासातील सहभाग पेक्षा कमी सर्वेक्षणाचे निष्कर्ष ऑनलाइनसाठी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही प्रशिक्षण आवश्यक. सुमारे टक्के ऑनलाइन वर्गात विद्यार्थी उपस्थित. एका तासासाठी जीबी डेटा आणि प्रति सेकंद डेटाची आवश्यकता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण शक्य होत नाही सुमारे ४६ टक्के विद्यार्थ्यांचे गृहपाठ अपूर्ण. ऑनलाइनबरोबरच प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी आवश्यक. एमबी असमाधानकारक: ७४टक्के समाधानकारक २६टक्के असमाधानकारक सारखाच तटस्थ ६१ परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांचे मत आकडेवारी टक्क्यांत) घेऊचन तोंडीघ्यावी ऑनलाइन घ्यावी"

शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे

  • विद्यार्थ्यांशी थेट संवाद वाढवावा
  • आवश्‍यक तेवढे ऑनलाइन शिकवा, उरलेले साहित्य उपलब्ध करून द्या
  • शिकविताना पीपीटी, डेमो, व्हिडिओ दाखवा

अशी असावी ऑनलाइनची पॉलिसी -

  • प्रत्येक विषयाचे ऑनलाइनसाठीचे साहित्य विकसित करावे
  • शिक्षकाला त्याच्या सोयीनुसार वर्गाची वेळ निश्‍चित करता यावी
  • ऑनलाइन परीक्षेसाठी मुलाखत, क्वीझ, ओपन बुक टेस्ट, प्रेझेंटेशन यांचा वापर करावा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 percentage of students are dissatisfied with online education