पिंपरी : आगीत सत्तर गोडाऊन जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवडसह पुण्यातूनही अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. या आगीत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नसून, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

पिंपरी - कुदळवाडी (चिखली) येथे रविवारी (ता.5) रात्री लागलेल्या आगीत सुमारे सत्तर गोडाऊन जळून खाक झाली. या आगीत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

रविवारी साडेआकराच्या सुमारास लागलेली ही आग आज (सोमवारी) सकाळी आटोक्यात आणण्यात आग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. प्लॉस्टीक कचरा, पुठ्ठा, लाकूड, थरमाकोल आदी वस्तुंनी हे गोडाऊन भरलेले असल्याने सोमवारी आकरा वाजेपर्यत्न ही आग धुमसत होती. त्यामुळे पुर्ण आग विझविण्यासाठी आग्निशामक दलास सोमवारी पुर्ण दिवस झगडावे लागणार असल्याची माहिती आग्निशामक दलाच्या आधिकाऱयांनी दिली. 

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवडसह पुण्यातूनही अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. या आगीत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नसून, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Web Title: 70 scrap shops, warehouses gutted in major fire in Pimpri