पुणे : आजारपणाला कंटाळून ७० वर्षीय आजींचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

आजारपणाला कंटाळून कालव्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 70 वर्षीय आजींना नागरिकांनी वाचविले. ही घटना वानवडीमधील चिमटावस्ती येथे गुरवारी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

हडपसर (पुणे) : आजारपणाला कंटाळून कालव्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 70 वर्षीय आजींना नागरिकांनी वाचविले. ही घटना वानवडीमधील चिमटावस्ती येथे गुरवारी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कालव्यात पाणी कमी असल्याने व नागरिकांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे आजींचा जीव वाचला. मीरा बाबू धुळे असे या अजींचे नाव आहे. त्या वानवडी येथील आझादनगर येथे राहतात. दहा फूट खोल कालव्यात आजींनी उडी मारल्याचे तेथून जाणाऱ्या दिपाली कवडे व बेबी साळवे यांनी पाहिले. तातडीने कवडे व साळवे यांनी नागरिकांना आजींना वाचविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. सुदैवाने कालव्यात पाणी कमी होते. त्यामुळे आजींचा जीव वाचला. मात्र कालव्यात पडलेल्या आजीला या घटनेत दुखापत झाली. त्यांना उठता व चालता येत नव्हते. नागरिकांनी पोलिसांना व 108 अँबुलन्सला फोन केले. मात्र मदतीसाठी कोणीच आले नाहीत. अखेर नागरिकांनी त्यांना दवाखान्यात उपचारासाठी रिक्षामधून हलविले व याबाबत त्यांनी वानवडी पोलिस ठाण्याला माहिती कळवली.

पुणे : डीएसकेमध्ये गुंतवणुक करणाऱ्या ठेवीदाराचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या

दिपाली कवडे व बेबी साळवे म्हणाल्या, कालव्यात थोडेच असल्यामुळे आजी बुडाल्या नाहीत. मात्र, उडी मारल्यामुळे त्या जखमी झाला. त्यांना उठता देखील येत नव्हते. अखेर नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले व पुढील उपचारासाठी हलविले. आम्ही आजींना कालव्यात उडी मारतानाचे पाहिले, म्हणून बरे झाले. त्यामुळे आजींना वेळीच मदत मिळाली. दिवस मावळण्याची वेळ होती. थोडा प्रकाश होता, म्हणून आजीने उडी मारल्याचे दिसले. अन्यथा अंधारात ही घटना आमच्या लक्षात आली नसती.

Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

नागरिक संजय भोसले म्हणाले, कालव्यात पाणी कमी होते. त्यातच कालव्यात मोठया प्रमाणात गाळ साचला होता. दगडेही होती. त्यामुळे आजींना कालव्यात उडी मारल्याने दुखापत झाली. आजींना कालव्यातून उचलूनच बाहेर काढावे लागले. मी आजाराला कंटाळूनच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे यावेळी आजींनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 year old grandmother try to commits suicide after suffering illness In Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: