Video:सत्तरीतील आजी, इनोव्हा कारमधून विकते भाजी; दिवसाला कमावते किती?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात.

पिंपरी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. आता तुम्हीच ठरवा काय करायचे ते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 1 person

माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये 'लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. त्यांची इनोव्हा आता परिसरात परिचयाची झाल्याने त्यांना 'भाजी घ्या, भाजी घ्या...' असे ओरडण्याची वेळ नाही.

आणखी वाचा - एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; संशय कोणावर?

त्यांच्या गाडीत संक्रांतीनिमित्त सर्व भाजीपाला, बाजरी आणि लागणारे तीळ हेसुद्धा पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवले आहेत. दिवसाला सुमारे आठ हजार रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारमध्ये बसून भाजी विकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. याबाबत त्यांचा मुलगा संदीप म्हणाला, "यंदा कांदा महागल्याने त्यातून पैसे चांगले मिळाले. दिवाळीला फॉर्च्युनर गाडी घेणार आहे. तीन चाकी गाडीवरून सुरू झालेला प्रवास हा आज एका 25 लाखांच्या कारपर्यंत येऊन पोचला आहे.'' त्यांचे 15 जणांचे एकत्रित कुटुंब आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 year old woman selling vegetables in innova car at pimpri chinchwad