भिगवण टोलनाक्यावर 72 हजारांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नाकाबंदीदरम्यान भिगवण टोल नाका येथे पोलिसांनी 72 हजार रुपयांची रोकड जप्त केली. 

बारामती शहर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. या नाकाबंदीदरम्यान भिगवण टोल नाका येथे पोलिसांनी 72 हजार रुपयांची रोकड जप्त केली. 

या रकमेबाबत गाडी मालकाने समाधानकारक खुलासा न केल्याच्या कारणावरून ही रक्कम पोलिसांनी जप्त करून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.

बारामती-भिगवण रस्त्यावर डायनामिक्स कंपनी नजीक असलेल्या टोल नाक्याजवळ एका फोर्ड कंपनीच्या गाडीतून ही संशयित रोकड आज सायंकाळी जप्त करण्यात आल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक चौकशी सुरू असून, चौकशीनंतरच याबाबत ठोस माहिती देता येईल, असे गोडसे यांनी सांगितले.
 

Web Title: 72 Thousand Cash seized in Bhigwan Pune