थकबाकीपोटी तोडली 75 हजार ग्राहकांची वीज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलाचा भरणा न करणाऱ्या 75 हजार 109 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आली आहे. या थकबाकीदारांकडे 32 कोटी 84 लाखांची थकबाकी असून, गेल्या 23 दिवसांत ही कारवाई केली आहे. 

महावितरणने पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या पाचही जिल्ह्यांत थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाईत (कंसात थकबाकी) पुणे जिल्हा- 36, 105 (23 कोटी 43 लाख), कोल्हापूर- 9, 794 (2 कोटी 57 लाख), सांगली- 5,187 (94 लाख 88 हजार), सोलापूर- 19,124 (4 कोटी 54 लाख) तर सातारा जिल्ह्यात 4, 899 ग्राहकांचा (1 कोटी 35 लाख) वीजपुरवठा खंडित केला आहे. या मोहिमेत शुक्रवारी (ता. 23) एका दिवशी 6 हजार 435 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला. 

Web Title: 75 thousand electricity consumers to overlook the outstanding cut

टॅग्स