esakal | पुणे शहरात आज ७७ ठिकाणी लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

पुणे शहरात आज ७७ ठिकाणी लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शासनाकडून महापालिकेला १५ हजार ९०० हजार कोव्हीशील्डचे डोस (Covishield Dose) मिळाले आहेत. तर कोव्हॅक्सीनचा (Covaxin) साठा उपलब्ध आहे त्याद्वारे मंगळवारी (ता. १३) ७७ केंद्रांवर लसीकरण (Vaccination) करण्यात येणार आहे. ७१ ठिकाणी कोव्हीशील्ड आणि ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण होणार आहे. या केंद्रांवर १८ वयाच्या पुढील सर्वांना लस उपलब्ध होईल.

हेही वाचा: कोरोना मृत्यूमध्ये ‘साठी’च्या वरचे सर्वाधिक

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (१९ एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

- ६ केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

- १४ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

loading image