संततधार पावसातही 78 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

वडगाव मावळ  : दिवसभर संततधार पाऊस असूनही नवनिर्मित वडगाव नगरपंचायत निवडणूकीसाठी उत्स्फूर्तपणे सुमारे 78 टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडल्याची माहिती प्रांत सुभाष भागडे व तहसीलदार रणजीत देसाई यांनी दिली. वडगाव नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवकपदाच्या सतरा जागांसाठी 47 असे एकूण 53 उमेदवार रिंगणात होते.

नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक असल्याने कार्यकर्त्यांप्रमाणेच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. वडगाव परिसरात सकाळपासून दिवसभर पावसाची संततधार सुरू होती परंतु या पावसाचा मतदानावर अजिबात परिणाम झाला नसल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकूण 7 हजार 596 पुरूषांपैकी 5 हजार 908 तर 7 हजार 140 महिलांपैकी 5 हजार 612 अशा एकूण 11हजार 520 (78.18 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग 12 मध्ये सर्वाधिक 86.21 टक्के तर प्रभाग 7 मध्ये सर्वात कमी 66.77 टक्के मतदान झाले. मतमोजणी शुक्रवारी ( ता.20)  सकाळी दहा वाजता येथील महसूल भवनात होणार आहे.

Web Title: 78 per cent voting in continuous rainy season