पिंपरी-चिंचवड शहरात आज 795 कोरोना पाॅझिटीव्ह तर 'एवढ्या' नागरिकांचा मृत्यू

daund.jpg
daund.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 795 जणांचा तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे एकूण संख्या 25106 झाली आहे. आज 301 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 17407 जण बरे झाले आहेत. सध्या, 7276 जणांवर उपचार सुरू आहेत. आज शहरातील 15 व बाहेरील एक अशा 16 जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या 423 झाली आहे.

आज मृत झालेले रुग्ण पुनावळे (पुरुष 68 वर्षे), दापोडी (स्री 60 वर्षे), भोसरी (पुरुष 75 वर्षे, सरली 45 वर्ष), कासारवाडी (पुरुष 63 वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष 98, पुरुष 77, पुरुष 59 व पुरूष 45 वर्षे), मोशी (स्त्री ५3 वर्षे), सांगवी (पुरुष 53 वर्षे), निगडी (पुरुष 57 वर्षे), पिंपरी (पुरुष 60 वर्षे), आकुर्डी (स्री ६3 वर्षे), किवळे (पुरुष 72 वर्ष) व चाकण (पुरुष 50 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com