#PuneFlood : तीन दिवसांत घटले 7 लाख प्रवासी

7lac passengers declined in three days
7lac passengers declined in three days

गेल्या तीन दिवसांत पुण्यात तुफान पाऊस झाला. धरणे भरल्याने नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठचे रस्ते तर बंद झालेच; पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारे पाच पूलही पाण्याखाली गेले. यामुळे शहराच्या विविध भागांत वाहतुकीची कोंडी झाली अन्‌ त्यात पीएमपीच्या बसही अडकल्या. याचा फटका पीएमपीच्या प्रवासी संख्येला आणि उत्पन्नालाही बसला.

पावसाचा जोर कमी झाला, तर पीएमपीची वाहतूक सुरळीत होईल. त्यातून प्रवाशांनाही दिलासा मिळेल. रस्त्यांवरील खड्डे आणि कोंडीमुळे वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. 
- जनसंपर्क विभाग, पीएमपी


कॉलेजला सुटी होती. परंतु वाकडहून पुण्यात जायचे होते. शनिवारी त्यासाठी दोन तास बसची वाट बघितली. बस मिळाली. परंतु वाहतूक कोंडीत दीड तास गेला, तरीही पुण्यात येता आले नाही. पावसात पीएमपीचा प्रवास खरेच अवघड होतो. 
- अक्षय लोंढे, युवक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com