टॅंकरवर वर्षाला आठ कोटी खर्च

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

या योजनेचे प्रत्यक्षात काम मे २०१९ मध्ये सुरू झाले होते. ही योजना आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. लष्कर पाणीपुरवठा केंद्रापासून जलवाहिनी टाकण्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. जलशुद्धीकरण केंद्र व पंपहाउस याचे काम ६० ते ७० टक्के पूर्ण झाले आहे. मार्चपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- वैशाली अवटी, कार्यकारी अभियंता, एमजीपी

पुणे - फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे (एमजीपी) योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र, लाल फितीच्या कारभारामुळे हा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेला या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. सध्या यासाठी वर्षाला तब्बल आठ कोटी रुपये मोजावे लागत आहेत. 

पुण्यातील कचरा फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये टाकला जात होता. यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी व भूगर्भातील पाणीही दूषित झाले होते. हा डेपो बंद करण्यासाठी २००९-१० मध्ये आंदोलन सुरू झाले, तेव्हा हा डेपो तर बंद केला जाईल, पण दोन्ही गावांच्या विकासासाठी महापालिकेने निधी देण्याचे मान्य केले. आता या दोन्ही गावांमध्ये मोठी बांधकामे झाली असून, लोकसंख्याही वाढल्याने टॅंकरची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

रोज टॅंकरच्या १८० फेऱ्या  
फुरसुंगी-उरुळी देवाची पाणीपुरवठा योजना रखडली 
३३ एमएलडीचा प्रकल्प 
जलवाहिनीचे काम लटकले
मार्चमध्ये काम पूर्ण करण्याची नवी मुदत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 Crore Expenditure Water Tanker